रमाई आवास योजना (नागरी) मी, लक्ष्मण तुकाराम जाधव वय
60 वर्षे, राहणार नांद्राकोळी ता.जि. बुलडाणा. मी माझ्या घराबद्दल यशोगाथा
लिहितो की, माझा शेती व्यवसाय असून मी अल्पभूधारक आहे. माझ्याकडे कोरडवाहू
तीन एकर शेती असून त्यावरच माझ्या कुटुंबाचे उदरनिर्वाह चालतो. माझी मुले
उदरनिर्वाहासाठी बाहेर गावी राहतात. माझे कुडाचे घर होते, त्यामुळे दरवर्षी
ऊन, वारा व पावसाचा खूप त्रास सहन करावा लागत होता. मला कधी स्वप्नात
सुद्धा वाटले नव्हते की, माझे घराचे स्वप्न पूर्ण होईल. मी दरवर्षी
घरकुलासाठी अर्ज करायचो परंतु दरवेळेस माझा नंबर लागायचा नाही. मी हताश,
निराश व्हायचो. सर्व सरकारी कार्यालयाच्या चकरा मारायचो. माझे काम सोडून
मजुरी बुडवून मला सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागायच्या.
अशा
वेळी मला समाज कल्याण कार्यालयामार्फत रमाई आवास योजनेबद्दल माहिती
मिळाली. त्यानुसार मी, 2018 -19 मध्ये रमाई घरकुल योजनेसाठी ऑनलाइन अर्ज
सादर केला व ग्रामपंचायत कार्यालय नांद्राकोळी येथे कागदपत्रे सादर केली.
त्यानुसार माझे नाव पात्र मंजूर यादीत आल्याने मला व माझ्या कुटुंबियांच्या
सदस्यांना खूप आनंद झाला. मला माझे घराचे स्वप्न पूर्ण होताना दिसू
लागले. त्यानंतर घराचे काम सुरू होऊन माझे घरकुल पूर्ण झाले.आता मला माझ्या
घरकुलात राहत असताना ऊन, वारा, पाऊस यापासून माझ्या कुटुंबाचे संरक्षण होऊ
लागले त्यामुळे माझ्या घरातील वातावरण आनंदित राहू लागले. करिता मला या
शासकीय योजना योजनेचा खूप फायदा झाला असून, मी शासनाचा खूप खूप आभारी आहे.